Rajgurunagar Navratri Festival | राजगुरूनगरमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह; अजितदादा पवार, नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

पैठणी, दांडिया, गरबा अन् सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल; राजगुरूनगर शहर नवरात्रोत्सवाच्या रंगात

Rajgurunagar Navratri Festival | राजगुरूनगरमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह; अजितदादा पवार, नाना पाटेकर यांना श्रद्धांजली

 

महावार्ता लाईव्ह | राजगुरूनगर शहरात सध्या नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे. उत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी चिमुकल्यांसाठी कला-क्रीडा स्पर्धा तसेच महिलांसाठी पैठणी, दांडिया तसेच विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन केले आहे. यामुळे संपूर्ण शहरात भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


राजगुरूनगर शहरातील मंडळांकडून दर्शनी भागात फ्लेक्स लावून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा यांची रेलचेल सुरू असतानाच, राजगुरूनगर मधील काही मंडळांनी सामाजिक जाणीव जपत महाराष्ट्राच्या दोन ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले.

 

तसेच आपल्या अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट स्वर्गीय विश्वनाथ (नाना) पाटेकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. या दोन्ही दिवंगत व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतींना उजाळा देत शहरातील मंडळांनी नवरात्रोत्सव मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि दर्शनी भागात भव्य फ्लेक्स लावून या दोन महान कर्तृत्वावान व्यक्तींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली.


या मंडळांकडून श्रद्धांजली!

राक्षेवाडी परिसरातील ओमसाई मित्र मंडळ (साईनगर, राक्षेवाडी), उदय मित्र मंडळ (राक्षेवाडी) तसेच शिवतेज नवरात्र उत्सव मंडळ ( माळीमळा ) संभाजी ग्रुप (संभाजीनगर ) आदी प्रमुख मंडळांनी आपापल्या मंडपाच्या दर्शनी भागात श्रद्धांजलीचे फलक उभारले आहेत. उत्सवाचा आनंद साजरा करत असतानाच, महाराष्ट्राच्या विकासात व कलाविश्वात मोठे योगदान देणाऱ्या या दोन्ही दिवंगत नेत्यांप्रती व्यक्त करण्यात आलेल्या या भावनेचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

 


महिला व बालकांसाठी उपक्रमांची रेलचेल

शहरातील नवरात्रोत्सवाचे यंदाचे मुख्य आकर्षण म्हणजे महिला व लहान मुलांसाठी राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम ठरत आहेत. चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वक्तृत्व, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, नृत्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने पैठणी, दांडिया व गरबा रासचे रंगतदार कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असून संपूर्ण राजगुरूनगर शहर नवरात्रोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.


"नवरात्र हा केवळ सण नसून सामाजिक एकात्मतेचा उत्सव आहे. या पवित्र पर्वात आनंद साजरा करत असतानाच,महाराष्ट्र व पुणे जिल्ह्याच्या विकासाचा चेहरा असलेले आमचे मार्गदर्शक स्व.अजितदादा पवार आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते स्व. नाना पाटेकर यांच्या स्मृतींना वंदन करणे हे आमचे कर्तव्य मानून आम्ही ही आदरांजली वाहिली आहे."
 - दिनेश सांडभोर - नगरसेवक, अध्यक्ष, ओम साई मित्र मंडळ 

“लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणे, महिलांसाठी विविध उपक्रम राबवणे आणि महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची आठवण जपणे, हा आमचा प्रयत्न आहे,” - सुरज अशोकदादा राक्षे - (उदय मित्र मंडळ,राक्षेवाडी)