शिंदे गावचे आदर्श माजी सरपंच गोरख टेमगिरे यांचे दुःखद निधन; सामाजिक, राजकीय क्षेत्रात हळहळ
शिंदे गावच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक जडणघडणीत मोलाचे योगदान; डाऊ केमिकल हटाव आंदोलनातही घेतला होता सक्रिय सहभाग
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील शिंदे गावचे आदर्श माजी सरपंच गोरख रामभाऊ टेमगिरे (वय ६४) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोरख टेमगिरे यांनी शिंदे गावच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. सरपंचपदाच्या कार्यकाळात त्यांनी गावात विविध लोकोपयोगी कामे करून गावाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू करून कुटुंबाच्या प्रगतीस हातभार लावला.
डाऊ केमिकल कंपनी हटाव आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. सामाजिक प्रश्नांबाबत ते नेहमीच जागरूक राहिले. त्यांच्यावर शिंदे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजाच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.
गोरख टेमगिरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ, पुतणे, भाचे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष तथा शिंदे विकास सोसायटीचे अध्यक्ष मेजर दत्तात्रय टेमगिरे यांचे ते बंधू, तर उद्योजक सुरेश टेमगिरे यांचे वडील होत.
दशक्रिया विधी -
रविवार दि.१६/८/२०२६ रोजी सकाळी ७-३० वाजता वैकुंठभूमी, शिंदेगाव,ता.खेड,जि.पुणे येथे होणार आहे.
शनिवार दि.१५/८/२०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत वाणीभुषण हभप सागर महाराज शिर्के यांचे प्रवचन होईल.