विक्रमी मतांनी विजयी झालेल्या काळुराम गाडे यांचा राधे फाउंडेशन वतीने सत्कार
जय मल्हार विकास सोसायटीच्या निवडणुकीत १६५ मते मिळवत ५५ मतांनी विजय; राजगुरूनगरात राधे फाउंडेशन वतीने सन्मान
महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथील जय मल्हार विविध विकास सोसायटीच्या संचालकपदी काळुराम धोंडिभाऊ गाडे यांची विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल राधे फाउंडेशन यांच्या वतीने राजगुरूनगर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
खरपुडी खुर्द येथील जय मल्हार विविध विकास सोसायटीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. निवडणुकीत सुरुवातीपासूनच मोठी रंगत निर्माण झाली होती. या निवडणुकीत इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारसंघातून काळुराम धोंडिभाऊ गाडे यांनी सर्वाधिक १६५ मते मिळवत ५५ मताधिक्याने आपल्या विरोधी उमेदवाराचा पराभव केला. त्यांच्या या दमदार विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गाडे यांच्या या उल्लेखनीय विजयाबद्दल राधे फाउंडेशन वतीने राजगुरूनगर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी काळुराम गाडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सामाजिक व सहकार क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सिद्धेश्वर सोसायटी व्हॉइस चेअरमन अमोल सांडभोर, उद्योजक विकास चव्हाण, माजी चेअरमन कांताराम शिंदे, वाफगाव सोसायटीचे संचालक धनंजय भागवत, सचिन पाटणे, राधे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत करमारे, खजिनदार संग्राम पवार संचालक मोहीन शेख, अक्षय करमारे, आर्किटेक पराग भवार आदी उपस्थित होते.
जय मल्हार विविध विकास सोसायटीच्या निवडणुकीत मिळवलेले १६५ मतांचे बळ आणि ५५ मतांचे मताधिक्य हे गाडे यांच्यावरील सभासदांचा विश्वास अधोरेखित करणारे ठरले आहे. त्यांच्या या विजयामुळे खरपुडी खुर्दच्या सहकार क्षेत्रात नव्या नेतृत्वाला बळ मिळाल्याची चर्चा परिसरात होत आहे.