NIPM पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर मार्फत - NPS आणि नवीन कामगार संहितेवरील परिसंवादाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; २२५ हून अधिक HR व्यावसायिकांचा सहभाग

राष्ट्रीय पेन्शन योजना आणि बदलत्या कामगार कायद्यांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन ; NPSचे फायदे, आर्थिक नियोजन आणि उद्योग क्षेत्रातील कायदेशीर बदलांवर चर्चा; HR व्यावसायिकांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी दिली सविस्तर उत्तरे

NIPM पिंपरी चिंचवड चाकण चाप्टर मार्फत - NPS आणि नवीन कामगार संहितेवरील परिसंवादाला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद; २२५ हून अधिक HR व्यावसायिकांचा सहभाग

 

महावार्ता लाईव्ह | नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंट (NIPM) – पिंपरी-चिंचवड-चाकण (PCC) चॅप्टरच्या वतीने राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) आणि नवीन कामगार संहिता (New Labour Codes) या महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित विशेष परिसंवादास कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल द फर्न येथे झालेल्या या परिसंवादात कोल्हापूर व परिसरातील औद्योगिक आस्थापनांमधील २२५ हून अधिक मनुष्यबळ विकास अधिकारी (HR) आणि व्यावसायिक सहभागी झाले.

 

Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA), HR Forum India, SMAK आणि HR Milap यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दोन स्वतंत्र सत्रे आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून उपस्थितांना राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच बदलत्या कामगार कायद्यांबाबत अद्ययावत माहिती देण्यात आली.

 

 

कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता, प्रभावी निवृत्ती नियोजन, NPSचे फायदे, गुंतवणुकीचे उपलब्ध पर्याय आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन यासोबतच उद्योग क्षेत्रासमोरील बदलती कायदेशीर आव्हाने याबाबत HR व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे हा परिसंवादाचा प्रमुख उद्देश होता.

 

NSP वर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

National Pension System (NPS) विषयावरील सत्रात PFRDAचे असिस्टंट मॅनेजर अजिंक्य देशपांडे आणि UTI Pension Fundचे Senior Vice President तथा Regional Head – West केदार सालवेकर यांनी मार्गदर्शन केले.

 

केदार सालवेकर यांनी NPSची वैशिष्ट्ये, निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन, कर्मचारी व नियोक्त्यांसाठी उपलब्ध लाभ, गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी नियोजनाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. संवादात्मक पद्धतीने झालेल्या या सत्रामुळे उपस्थितांना NPS आणि निवृत्ती नियोजनाच्या विविध पैलूंबाबत अधिक स्पष्टता मिळाली.

 

 

प्रश्नोत्तरांच्या सत्रात HR व्यावसायिकांनी विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांशी थेट संवाद साधला. KPMGच्या अनिश्या यांनीही NPS आणि संबंधित आर्थिक नियोजनाच्या विषयावर मार्गदर्शन केले.

 

नवीन कामगार संहितेवर सविस्तर चर्चा

परिसंवादातील दुसऱ्या सत्रात New Labour Codes या विषयावर तज्ज्ञांच्या पॅनेलमध्ये सविस्तर चर्चा झाली. बदलत्या कामगार कायद्यांचा उद्योग आणि HR क्षेत्रावर होणारा परिणाम, अनुपालनातील बदल, कर्मचारी संबंध, वेतन व सामाजिक सुरक्षा तसेच HR व्यावसायिकांच्या बदलत्या भूमिकांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

 

पॅनेल चर्चेचे समन्वयन प्रणव बेहरे यांनी केले. पॅनेलमध्ये दीपक जोशी, सत्यवान फडतरे, श्रीकृष्ण गंधे आणि हरीश सैवे यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे कामगार कायद्यांतील बदलांचे विविध व्यावहारिक पैलू स्पष्ट केले. उपस्थितांच्या प्रश्नांमुळे चर्चेला अधिक संवादात्मक स्वरूप प्राप्त झाले.

 

NIPM PCC पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

NIPM PCC चॅप्टरचे संस्थापक अमोल कागवाडे, अध्यक्ष प्रदीप मानेकर, सचिव नवनाथ सूर्यवंशी आणि उपाध्यक्ष अर्जुन माने यांनी उपस्थित HR प्रतिनिधी व व्यावसायिकांना मार्गदर्शन केले. HR क्षेत्रातील ज्ञानवृद्धी, व्यावसायिक विकास, कर्मचारी कल्याण आणि उद्योगाच्या बदलत्या गरजांशी संबंधित उपक्रमांमध्ये HR व्यावसायिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, यावर यावेळी भर देण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी HR Forum Indiaचे विशेष सहकार्य लाभले. रवींद्र जगदाळे, संजय बेणके, अनंत पाटील, संग्राम पाटील, संदीप सावंत, संदीप देसाई, शरद देसाई, अमित पिसाळ आणि अमोल खाडे यांनी नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अनंत पाटील यांनी केलेले सूत्रसंचालन विशेष आकर्षण ठरले.

 

SMAKचे अध्यक्ष राजू पाटील यांचेही कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. SMAKच्या सुविधांचा वापर करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याबद्दल NIPM PCCच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

NIPM PCC कार्यकारिणीचे योगदान

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात NIPM PCC Executive Committeeच्या सदस्यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अमित देशपांडे, राहुल निंबाळकर, आप्पा मोरे, रमेश बागल, राजन पाटील, दत्ता पवार, राजू महानवर, विजय पाटील, मधुकर सूर्यवंशी, दीपक पाटील, विशाल भालेराव, अक्षय शिंदे, सुयोग धवळे, किरण मोहकर, सूरज पोळ आणि शरद सांडभोर यांच्यासह पुणे, शिरवळ आणि सातारा परिसरातील NIPM PCC टीमच्या सदस्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत परिश्रम घेतले.

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संजय बेणके, संग्राम पाटील, क्षितिज शिंपी आणि संदीप सावंत यांनीही विशेष परिश्रम घेतले. भविष्यात HR व्यावसायिकांच्या ज्ञानवृद्धी, कर्मचारी कल्याण, व्यावसायिक विकास आणि उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजांशी संबंधित विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे NIPM PCCच्या वतीने सांगण्यात आले.

 

HR Forum India, SMAK, HR Milap आणि NIPM PCC चॅप्टरच्या संयुक्त प्रयत्नांतून आयोजित करण्यात आलेला हा परिसंवाद HR क्षेत्रातील ज्ञानाची देवाणघेवाण आणि व्यावसायिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरला. भविष्यातही कोल्हापुरात अशा प्रकारचे संयुक्त उपक्रम आयोजित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.