खरपुडी बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी संजीव भोगाडे यांचे निधन ; राजगुरूनगर नगरपरीषदेच्या नगरसेविका स्नेहल राक्षे यांना पितृशोक

शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाच्या भोगाडे यांच्या निधनाने खरपुडी गावावर शोककळा

खरपुडी बुद्रुकचे सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी संजीव भोगाडे यांचे निधन ; राजगुरूनगर नगरपरीषदेच्या नगरसेविका स्नेहल राक्षे यांना पितृशोक

 

महावार्ता लाईव्ह | खरपुडी बुद्रुक (ता. खेड) : येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी संजीव ( आप्पा ) बबन भोगाडे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने खरपुडी बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

संजीव भोगाडे हे शांत, संयमी आणि मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यासोबतच शेती क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.त्यांच्यावर खरपुडी बुद्रुक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

संजीव ( आप्पा ) भोगाडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते सुमित भोगाडे व राजगुरुनगर नगरपरिषदेच्या नगरसेविका स्नेहल राक्षे यांचे ते वडील होत. तसेच राक्षेवाडीचे सरपंच मच्छिंद्रशेठ राक्षे यांचे ते सासरे होत.

 

११ ऑगस्ट रोजी दशक्रिया विधी

संजीव (आप्पा ) भोगाडे यांचा दशक्रिया विधी मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता भीमानदीतीरी, खरपुडी बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे येथे होणार आहे.