लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे अपूर्ण कार्य पालकमंञी सुनेत्रा पवार पूर्ण करतील :- ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे

गरजवंत मराठा समाजाला मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील मिळवून देतील :- पांडुरंग आवारे पाटील

लोकनेते स्व.अजितदादा पवार यांचे अपूर्ण कार्य पालकमंञी सुनेत्रा पवार पूर्ण करतील :- ह.भ.प.लक्ष्मण महाराज मेंगडे

 

महावार्ता लाईव्ह | बीड तालुक्यातील मानेवाडी गावचे जागृत देवस्थान अंबाबाई मंदिराचा लोकार्पण सोहळा नेकनूर येथील बंकटस्वामी संस्थान आणि श्रीक्षेत्र आळंदी व पंढरपूरचे मठाधिपती गुरूवर्य हभप लक्ष्मण महाराज मेंगडे यांचे सुश्राव्य कीर्तनाने संपन्न झाला.

 

भगवतगीता पारायण, नवनाथ ग्रंथ समाप्ती व कळस उभारणीसाठी स्वच्छने देणगी दिलेल्या महिलांना मुर्ती वाटप करून सन्मान केला. ह.भ.प.श्री.लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी मानेवाडी सारख्या छोट्याशा गावात गावचे जागृत देवस्थान आई अंबाबाई मंदिर लोकवर्गणीतून ३० ते ३५ लाख रूपये गोळा करून उभारले. तर आठ वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून हनुमान मंदिर उभारले आणि २० लक्ष रुपये खर्च केले. तसेच हनुमान मंदिरासाठी तत्कालीन आमदार विनायक मेटे यांनी ५ लक्ष रुपये निधी दिला होता.गावात मंदिराची उभारणी करताना ग्रामस्थांचा एकविचार असल्याबद्दल मानेवाडी ग्रामस्थांचे मेंगडे महाराजांनी कौतूक केले.

 

 

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार व लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या आठवणींना उजाळा देताना गतवर्षी अजितदादा हे पूरग्रस्ताची पाहणी करायला चौसाळा गावात आले होते.त्यावेळेस या भागाचे युवा नेतृत्व पांडुरंग आवारे पाटील यांनी अजितदादांकडे चौसाळ्यासह माळेवाडी, रूईगव्हाण,पिंपळगाव घाट, वाढवाणा, मानेवाडी या पाच गावाकडे जाणार्‍या रस्त्याची व पुलाची वस्तुस्थिती मांडली व रस्त्याच्या विकास कामाला निधीची मागणी केली होती. अजितदादांनी तात्काळ ५ कोटी रुपयेचे बजेट मंजूर केले होते. निधी मिळाल्याने रस्ता पुर्ण झाला असून चौसाळा व रूईगव्हाण येथील पुलाचे बांधकाम सध्या निधी अभावी रखडले आहे.

 

बीड आणि धाराशिव जिल्ह्य़ातील सरहद्दीवरील जोड रस्ता व मांजरा नदीवरील बंदरा-पुलाचा प्रस्ताव मंञालयात प्रधान सचिव कार्यालयात दाखला आहे.मानेवाडीफाटा ते मानेवाडी पर्यंत रस्ता मंजूर होऊन लवकरच निधीही मिळेल व प्रश्न मार्गी लागेल.

 

आपल्या गावांचा व परिसराचा रखडलेला विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा,राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंञी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पुर्ण करुन घ्यावा.गरज पडल्यास मी देखील मानेवाडी गावांच्या व परिसराच्या विकासाठी माझे शिफारस पञ देतो आणि प्रत्यक्ष भेट घेऊन पालकमंञी पवार यांचेशी चर्चा केली जाईल अशी भूमिका मेंगडे महाराजांनी स्पष्ट केली.

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईला जात आहेत.सर्वांनी सुखरूप जावे व मुंबईतुन आरक्षण घेऊन यावे असा सकारात्मक संदेश मेंगडे महाराजांनी उपस्थित मराठा बांधवांना दिला.

 

याप्रसंगी रोकडाआई देवस्थांनचे नरेश महाराज, राष्ट्रवादीचे युवानेते व मराठा सेवक पांडुरंग आवारे पाटील, पिंपळगाव घाटचे तलाटी रविराज सानप, कृषी सहाय्यक वैभव नांदे, पिंपळगाव घाटचे ग्रामसेवक सय्यद शफीक यासह परिसरातील गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच ,सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर व मानेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. अंबाबाई याञा कमिटीचे अध्यक्ष सुग्रीवनाना ईगोले यांनी आभार मानले. उपस्थित सर्व भाविकांनी महाप्रसाद ग्रहण करीत कार्यक्रमाची सांगता झाली.