Dilip Mohite Patil strong leader | तालुक्याच्या विकासासाठी निधी खेचून आणणारा दिलीप मोहिते पाटील कणखर नेता : सहकारमंत्री पाटील
खेड तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी वाट्टेल ती राजकीय किंमत मोजणारा आणि तालुक्याच्या हितासाठी काम करणारा माणूस म्हणजे दिलीपराव मोहिते आहेत - मंत्री पाटील
महावार्ता लाईव्ह | दिलीपराव मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा विस्ताराला गती देऊन विकास सोसायट्यांना विशेष सहकार्य केले.सहकार चळवळीला अथक प्रयत्नाने चालना देऊन खेड तालुक्यात सहकार रुजविला. आपल्या तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा म्हणून राज्यातील अनेक मंत्र्यांसह आपल्या नेत्यांकडे आग्रह धरून भांडून निधी खेचून आणणारा कणखर नेता दिलीपराव मोहिते पाटील आहेत.असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड (राजगुरुनगर) शाखेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाखेचा शताब्दी महोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा कार्यक्रमात सहकार मंत्री पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील होते.राजगुरूनगर येथील बँकेच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला शिरूरचे माजी आमदार व बँकेचे संचालक अशोक पवार, बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे,उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष अरुण चांभारे, बँकेचे संचालक व जिपचे माजी सभापती संभाजी होळकर, संजय काळे,भालचंद्र जगताप, निर्मला जागडे, पूजा बुट्टे पाटील, अजित जाधवराव, प्रवीण शिंदे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे, समीर सुपे, सुनीता बुट्टेपाटील माजी जिप सदस्य अनिलबाबा राक्षे, मंगल चांभारे,
माजी सभापती अंकुश राक्षे, अरुण चौधरी, विलास कातोरे, नवनाथ होले, हिरामण सातकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, जेष्ठनेते अशोक खांडेभराड, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, किरण आहेर, पंचायत समिती सदस्य शंकर कावडे, अश्विनी तरस, श्रद्धा मांडेकर, महेंद्र मेदनकर, बाजार समिती संचालक पप्पू टोपे, रणजित गाडे, कमल कड, शांताराम भोसले, राजाराम लोखंडे, कांचन ढमाले, सखाराम शिंदे, कांचन ढमाले, संध्या जाधव,
पीडिसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शितोळे, जिल्हा उपनिबंधक जगताप,बँकेचे विभागीय अधिकारी तानाजी दौडकर, उल्हास देवदरे, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे स्वीय सहाय्यक सतीश कदम, सुनील देवकर,चाकण राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम गोरे यासह खेड तालुक्यातील विकास सोसायट्यांचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक,गावोगावचे सरपंच,उपसरपंच,सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री महोदय पाटील पुढे म्हणाले खेड तालुक्याचा विकास झाला पाहिजे यासाठी वाट्टेल ती राजकीय किंमत मोजणारा आणि तालुक्याच्या हितासाठी काम करणारा माणूस म्हणजे दिलीपराव मोहिते आहेत.खेड तालुक्याच्या हक्कासाठी लढणारे असल्याने त्यांना संधी द्या.2029 मध्ये दिलीप मोहिते पाटील आमदार होतील,असे सांगून ते म्हणाले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन मंत्री पाटील यांनी बँकेच्या संचालक मंडळाला दिले.
अध्यक्षीय भाषणात मोहिते पाटील म्हणाले,खेड तालुक्यात अजून एक शाखा पाहिजे आहे. तालुक्याला मंत्रीपदाची संधी होती पण तुम्ही घालविली. पण काही हरकत नाही. राजकारणात कायम कुणाची मक्तेदारी नाही. मी कायम जनतेच्या सुख दुःखात जातो. तालुक्यातील जनता मला पुन्हा एकदा आमदार करणार आहे. एखाद्या कार्यकर्त्याला संधी द्यायची असेल तर दिलीप मोहिते कशाचीही पर्वा करीत नाही. असे सांगून आमदार बाबाजी काळे यांचा नामोल्लेख टाळून टीका करताना ते म्हणाले शपथपत्रात चूक केल्याने त्यांचे आमदारपद जाणार हे नक्की आहे.

एखादे पद आले तर त्या पदाचा सन्मान केला पाहिजे. एखाद्याला आई माईवर घाणेरड्या शिव्या देणे ही वारकऱ्यांची संस्कृती आहे का ? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. नातेवाईक किंवा कार्यकर्त्यांचा मी कधीही गैरफायदा घेतला नाही. सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून काम केले. १२ वर्षाच्या काळात बँकेचा कारभार पारदर्शक केला. शेतकऱ्यांची बँक असून बँकेत भ्रष्टाचार होत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी अरुण चांभारे यांची निवड झल्याबद्दल त्यांचा सत्कार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे हस्ते झाला.तसेच १०० वर्ष पूर्ण झालेल्या खेड तालुक्यातील निघोजे, कुरुळी, रासे, चिंबळी, महाळूगे,भोसे, शेलगाव, दावडी, वेताळे, दोंदे, राजगुरूनगर, वडगाव पाटोळे, खरपुडी बुद्रुक, चास अशा एकूण १५ विकास सोसायट्यांचे पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंत्री महोदय यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.तसेच तालुक्यातील दोन बचत गटाच्या पदाधिकारी महिलांचा देखील सत्कार सन्मानचिन्ह देऊन यावेळी करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांचे भाषण झाले.प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी केले.सूत्रसंचालन निवेदक आदेश टोपे यांनी केले.आभार खेड तालुक्यातील बँकेचे विभागीय अधिकारी तानाजी दौंडकर यांनी मानले.