कडूस विविध कार्यकारी सोसायटीवर घनवट गटाची सरशी; शंकर कावडे यांच्याविरोधातील अविश्वास १० मतांनी मंजूर, दिलीप मोहिते गटाला मोठा धक्का

खेड तालुक्यातील कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत मोठी राजकीय घडामोड. अध्यक्ष शंकर कावडे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव १० मतांनी मंजूर. घनवट गटाचा विजय, माजी आमदार दिलीप मोहिते गटाला मोठा धक्का.

कडूस विविध कार्यकारी सोसायटीवर घनवट गटाची सरशी; शंकर कावडे यांच्याविरोधातील अविश्वास १० मतांनी मंजूर, दिलीप मोहिते गटाला मोठा धक्का

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुक्यातील सहकार आणि स्थानिक राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदावर असलेले पंचायत समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीतील गटनेते शंकर कावडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तब्बल १० मतांनी मंजूर झाला. या निकालामुळे सोसायटीवरील सत्तांतर निश्चित झाले असून, घनवट गटाने निर्णायक विजय मिळवत माजी आमदार दिलीप मोहिते गटाला मोठा राजकीय धक्का दिला आहे.

 

विशेष सभेत अविश्वास ठरावाला एकमुखी पाठिंबा

अविश्वास ठरावासाठी आयोजित विशेष सभेदरम्यान शंकर कावडे आणि त्यांच्या गटातील दोन संचालक गैरहजर राहिले. उपस्थित सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने एकमुखी मतदान करत तो १० मतांनी मंजूर केला. चेअरमन पदाचा राजीनामा शंकर कावडे यांनी अविश्वास ठराव तारखेच्या अगोदर दोन दिवसापूर्वी दिला होता.

 

खेड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीतील गटनेते असलेल्या शंकर कावडे यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेवरच अविश्वास ठराव मंजूर झाल्याने या निकालाची संपूर्ण खेड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रातील आगामी राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

घनवट गटाचा जल्लोष, नव्या नेतृत्वाकडे लक्ष

विजयानंतर घनवट गटाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. आता कडूस विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नव्या अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

जाहिरात