स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोणवडीत महिलांसाठी मोफत नथ मेकिंग प्रशिक्षण; वृक्षारोपण, वृक्षवाटप व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

खेड तालुक्यातील गोणवडी येथे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी मोफत नथ मेकिंग प्रशिक्षण, वृक्षारोपण, वृक्षवाटप तसेच विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटपाचे विविध सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले.

स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोणवडीत महिलांसाठी मोफत नथ मेकिंग प्रशिक्षण; वृक्षारोपण, वृक्षवाटप व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप


महावार्ता लाईव्ह | उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गोणवडी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरी खुर्द येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी मोफत नथ मेकिंग प्रशिक्षण वर्ग, वृक्षारोपण, वृक्षवाटप तसेच विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप असे विविध उपक्रम उत्साहात पार पडले.

 

महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत नथ मेकिंग प्रशिक्षण वर्गात ८० महिलांनी सहभाग घेतला. तसेच अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त महिलांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपरी खुर्द येथे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांनाही वृक्षांचे वाटप करण्यात आले. याशिवाय सरपंच वैशाली काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वितरण करण्यात आले.

 

या विविध उपक्रमांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सुनीता बुट्टे पाटील, पंचायत समिती सदस्या श्रद्धा मांडेकर तसेच सरपंच सुवर्णा तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दत्तात्रय सुदाम काळे, धनंजय तनपुरे, माजी सरपंच वैशाली दत्तू काळे, विद्यमान सरपंच सुवर्णाताई तनपुरे, संतोष काळे, अतुल काळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील मोहन काळे, प्रवीण सुकाळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे आयोजन सरपंच वैशाली काळे आणि दत्तू सुदाम काळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना धनंजय तनपुरे यांनी केली, तर उपस्थितांचे आभार वैशाली दत्तू काळे यांनी मानले. या उपक्रमांमुळे महिलांना कौशल्य विकासाची संधी मिळाली, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.