'माणुसकी जिवंत आहे' या पुस्तकाचे प्रकाशन व कृतज्ञता पुरस्कार सोहळा उद्या रविवारी संपन्न होणार

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त राजगुरूनगरमध्ये विशेष आयोजन; ११ समाजसेवकांचा होणार सन्मान

'माणुसकी जिवंत आहे' या पुस्तकाचे प्रकाशन व कृतज्ञता पुरस्कार सोहळा उद्या रविवारी संपन्न होणार

 

महावार्ता लाईव्ह | थोर क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या ११८ व्या जयंतीचे औचित्य साधून "माणुसकी जिवंत आहे" या पुस्तकाचे प्रकाशन आणि "कृतज्ञता पुरस्कार" सोहळा रविवार दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी राजगुरूनगर येथे आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे.असे आवाहन प्रसिद्ध निवेदक व पुस्तकाचे लेखक कैलास दुधाळे यांनी केले आहे.

      

राजगुरूनगर येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता पुस्तकाचे प्रकाशन आणि रस्त्यावरील बेवारस,मनोरुग्ण,वैफल्यग्रस्त,वयोवृद्ध व अनाथ मुलांचा सांभाळ करणारे समाजातील ११ महान समाजसेवकांना "कृतज्ञता पुरस्कार" सोहळा संपन्न होणार आहे.हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांचे अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे पद्मश्री पुरस्कारप्राप्त व जेष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे उपस्थित राहणार आहेत.नामवंत कीर्तनकार हभप डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर व महाराष्ट्र शासनाच्या मानसिक आरोग्य मंडळाचे सदस्य रवि बोडके यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 

कृतज्ञता पुरस्कार महान समाजसेवक दिलीप गुंजाळ, दादाराव गायकवाड, प्रीती वैद्य,गौरी धुमाळ,कांचन कदम,अनिल कुडिया,अक्षय बोऱ्हाडे,डॉ.नंदकुमार पालवे,डॉ.अभिजीत सोनवणे,माऊली सावंत व एम.ए.हुसेन यांना प्रदान करण्यात येणार आहे. माऊली सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रिक्षा चालक, प्रसिद्ध निवेदक कैलास दुधाळे यांनी लिहिलेल्या माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी होणार आहे. 


कार्यक्रमासाठी आमदार बाबाजी काळे,माजी आमदार व पीडिसीसी बँकेचे संचालक दिलीप मोहिते पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, राजगुरुनगर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, नामवंत लेखक देवा झिंजाड,चैतन्य संस्थेच्या सुधाताई कोठारी, माजी सभापती शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती भोगाडे, 


माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, देवेंद्र बुट्टे पाटील, राजगुरुनगर बँकेचे संचालक गणेश थिगळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे ,हुतात्मा राजगुरू फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,माजी सरपंच शांताराम घुमटकर, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, सिद्धार्थ चव्हाण ,जि.र.शिंदे गुरुजी,विठ्ठल भोर,देविदास तांबे,कृतिका सातकर,सुरेश भोर,हनुमंत भवारी अँड सुनील बांगर,संतोष गाढवे,दत्तात्रय सांडभोर,दिलीप मेदगे,शशांक मोहिते,सागर शेलार हे प्रमुख मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
----------------------------------