शिंदे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मेजर दत्तात्रय टेमगिरे यांची बिनविरोध निवड

शेतकऱ्यांना वेळेत कर्ज, विकासाला गती आणि पारदर्शक कारभाराचे आश्वासन ; शिंदे-वासुली ग्रामस्थांचा एकमताने निर्णय; बाजार समिती सभागृहात बिनविरोध निवड

शिंदे विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी मेजर दत्तात्रय टेमगिरे यांची बिनविरोध निवड

 

महावार्ता लाईव्ह | खेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष मेजर दत्तात्रय रामभाऊ टेमगिरे यांची खेड तालुक्यातील शिंदे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.सोसायटीचे संचालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत टेमगिरे यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.


खेडच्या एमआयडीसी क्षेत्रातील शिंदे व वासुली ही दोन गावे मिळून शिंदे विकास सोसायटी आहे. ठरल्याप्रमाणे मुदतीत रामदास लक्ष्मण पाचपुते यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदाची निवडणूक राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अध्यासी अधिकारी सुभद्रा बगाटे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यांना निवडणुकीत मदत सोसायटीचे सचिव सर्जेराव काळे यांनी केली.

 

 

सोसायटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.निवडणूक प्रसंगी उपस्थितांनी नवनिर्वाचित अध्यक्ष मेजर टेमगिरे यांना शुभेच्छा दिल्या.तर बाजार समितीचे सभापती अशोक राक्षे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष मेजर दत्तात्रय टेमगिरे यांचा सत्कार झाला.


निवडणूक प्रसंगी सभागृहात उपाध्यक्षा चंद्रभागा लक्ष्मण पाचपुते ,मावळते अध्यक्ष व सोसायटी संचालक रामदास लक्ष्मण पाचपुते, मालक पाचपुते, बबन पाचपुते, आनंदा माताळे, बबन घनवट, मारुती मेंगळे, गोरक्षनाथ पाचपुते, हिराबाई जांभळे यासह माजी सरपंच शिवाजी माताळे, माजी अध्यक्ष सुनील घनवट, सुनील देवकर,पोलीस पाटील अमोल पाचपुते, तुषार घनवट, काळूराम गायकवाड, विजय घनवट, तानाजी टेमगिरे, ननवनाथ देवकर, राजू टेमगिरे, अशोक मोहिते, निलेश पानमंद, अमोल झिंजूरके, सुखदेव जांभळे, संकेत घनवट, सुरेश पानमंद, आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुनील देवकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

    सोसायटीच्या सभासद शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल. सभासदांनी कर्जाची फेड वेळेत करावी. शासनाच्या कर्ज माफीचा लाभ पात्र सभासद शेतकऱ्यांना होणार आहे.सभासदांच्या हिताचे निर्णय आपण घेणार असल्याचे  नवनिर्वाचित चेअरमन मेजर दत्तात्रय टेमगिरे यांनी निवडीप्रसंगी बोलताना सांगितले.