National yoga day | आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ढुम्या डोंगरावर योगासने, प्राणायाम; उत्साहात योग दिन साजरा

योग, निसर्ग आणि आरोग्याचा सुंदर संगम; ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

National yoga day | आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ढुम्या डोंगरावर योगासने, प्राणायाम; उत्साहात योग दिन साजरा
National yoga day | आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ढुम्या डोंगरावर योगासने, प्राणायाम; उत्साहात योग दिन साजरा
National yoga day | आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ढुम्या डोंगरावर योगासने, प्राणायाम; उत्साहात योग दिन साजरा

 

महावार्ता लाईव्ह | निसर्गाचे वरदान आणि निरोगी आरोग्यासाठी शक्तीस्थळ ठरत असलेल्या राजगुरुनगरजवळील ढुम्या डोंगरावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात योगासने व प्राणायाम करून आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यात आला.

 

२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ढुम्या डोंगरावरील मारुती मंदिराच्या प्रांगणात विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक प्रा. महादेव घुले यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे मार्गदर्शन केले. योग आणि प्राणायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, तसेच रोगमुक्त जीवनासाठी नियमितपणे योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

ढुम्या डोंगराचा निसर्गरम्य परिसर आरोग्य संवर्धनासाठी उपयुक्त असून, प्रत्येकाने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी येथे नियमित मॉर्निंग वॉकसाठी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 

या कार्यक्रमास ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपचे अध्यक्ष नामदेव चव्हाण, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली करंडे, सचिव तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ता भालेराव, खजिनदार विशाल राक्षे, योगगुरू अँड. रामचंद्र घोलप, पांगरीचे उपसरपंच अँड. प्रकाश तळेकर, खेड टाईम्स वृत्तवाहिनीचे संपादक रोहिदास होले, वृक्षमित्र सुधाकर जाधव, अँड. दिलीप करंडे, नरेंद्र उर्फ लाला सावंत, अजित डोळस, जयंत घोरपडे, बँक अधिकारी प्रदीप सारडा, शामकांत खळदकर, निवृत्त फौजी मारुती भोकसे, सुधीर येवले, शशिकांत खळदकर, अरविंद माकडे यांच्यासह अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी योगासने व प्राणायाम करून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.

 

 

ढुम्या डोंगर आरोग्य संवर्धनाचे केंद्र

ढुम्या गिरीभ्रमण ग्रुपच्या माध्यमातून ढुम्या डोंगरावर विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मारुती मंदिर परिसरात ओपन जिम उभारण्यात आली असून, वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचे नियमित संगोपन केले जाते. तसेच दरवर्षी हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजनही करण्यात येते. ग्रुपच्या या उपक्रमांमुळे डोंगरावर येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदायी वातावरणासह विविध सुविधांचा लाभ मिळत असल्याचे अध्यक्ष नामदेव चव्हाण आणि कार्याध्यक्ष माऊली करंडे यांनी सांगितले.