Khed Krushi Utpanna Bazar Samiti | खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात संपन्न
सभापती अशोकदादा राक्षे यांचे प्रमुख उपस्थितीत बाजार समितीच्या वार्षिक सभेत अनेक धोरणात्मक निर्णय
महावार्ता लाईव्ह | खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.२४) रोजी खेळीमेळीच्या आनंदी वातावरणात संपन्न झाली.बाजार समितीचे सभापती अशोकदादा राक्षे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे होते.सभापती राक्षे यांचे मार्गदर्शनाखालील
सभेत शेतकऱ्यांसह आडतदार, व्यापारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना शिंदे आणि राक्षे यांनी समर्पकपणे उत्तरे दिली.

बाजार समितीच्या वार्षिक सभेला आमदार बाबाजी काळे, उपसभापती रणजित गाडे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे ,क्रांती सोमवंशी, सयाजी मोहिते, माणिक गोरे, सागर मुऱ्हे, सोमनाथ मुंगसे,अनुराग जैद, जयसिंग भोगाडे, कमल कड, महेंद्र गोरे, किशोर भोमाळे यासह नगरसेवक किशोर थिगळे, नामदेव कलवडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र थिगळे, माजी उपसभापती दशरथ गाडे, दत्तात्रय सातपुते, एल.बी.तनपुरे, कालिदास वाडेकर, सतीश चांभारे, भानुदास बुट्टे पाटील, लहू कोळेकर, नयन लांडे, संदेश सांडभोर, लक्ष्मण शिंदे, प्रभाकर जाधव, मारुती सातकर, महेश सांडभोर, संभाजी कलवडे, बाळासाहेब मांजरे उपस्थित होते.

सभेत आडतदार, व्यापारी, हमाल, मापाडी व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे आणि आश्वासन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला. बाजार समितीवर कोणत्याही बँकेचे किंवा संस्थेचे कर्ज नाही असे अहवाल वाचन करताना सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. यावेळी खेड व चाकण येथील आडतदार,व्यापारी, हमाल,मापाडी, शेतकरी यांचेसह जास्त शेतमाल व भाजीपाला विक्री करणारे अडतदारांचा सत्कार करण्यात आला.
वार्षिक सभेत उपस्थित प्रश्न
कालिदास वाडेकर यांनी पार्किंग बाबत प्रश्न उपस्थित करताना मंजूर झालेले चाकणला नवीन तहसील कार्यालयाला बाजार समितीत तात्पुरती स्वरूपात जागा द्यावी अशी मागणी केली.
बाजार समितीचे माजी उपसभापती दशरथ गाडे यांनी बाजार समितीच्या अहवालात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचा फोटो नाही असा महत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
कुमार गोरे प्रश्न उपस्थित करताना म्हणाले नवीन लायसन्स देऊ नये आणि वार्षिक सभा चाकणला घ्यावी.
माजी सरपंच मारुती सातकर - बाजार समितीचे कामकाज चांगले पारदर्शक चालू आहे.
शिवाजी पवळे - लायसन्स साठी आम्ही पैसे भरले आहेत आम्हाला लायसन्स द्यावे. लायसन्स मागणारी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमिपुत्र मुले आहेत.
संदीप शिंदे - बाजार समितीने मापाडी यांना विमा कवच द्यावे, अनेकवेळा त्यांच्यावर हल्ले देखील झाले आहेत. पगार वेळेवर होत नाहीत.
किशोर थिगळे - राजगुरूनगर बाजार आवारात नियोजित गणपती मंदिर उभारणीला आलेला अडथळा दूर करावा.
मच्छिंद्र रामाणे - व्यापारी म्हणून आम्ही भरपूर दिले बाजार समिती आम्हाला काय देणार असा प्रश्न उपस्थित केला.

सभेत अनेकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना विजय शिंदे म्हणाले बाजार समिती शेतकऱ्यांची संस्था असून संस्थेत पक्षाचा विषय येत नसल्याने सर्वपक्षीय संस्था आहे. संचालक मंडळाकडून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. चाकणला लवकरच फुलांचे आणि फळांचे मार्केट सुरू केले जाईल. चाकण बाजार आवारात पाच मजली इमारत लवकरच उभारली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताचे नवनविन प्रयोग राबविले जातील. आम्ही सर्व समन्वयाने व्यापक स्वरूपात काम करणार आहोत.
आमदार बाबाजी काळे बोलताना म्हणाले की कुंभमेळ्याच्या निमित्ताने २५० कोटी रुपये मंजूर असून कामांची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. अशोकदादा राक्षे यांना बाजार समितीच्या चांगला अनुभव असल्याने त्यांचे काम चांगले आहे.नवीन तहसील कार्यालयाला बाजार समितीत जागा उपलब्ध जागा देण्याचे नियोजन संचालक मंडळाने करावे.आताचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात चांगला आहे.चाकण एमआयडीसी ट्रॅफिक समस्या प्रश्न सोडविला जाईल.
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देऊन शेतमालाला अधिक भाव मिळावा यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. पाईट येथील जागेत बांधकाम सुरू असून मंगल कार्यालय उभारण्याचे नियोजित आहे. राजगुरूनगर बाजार आवारात गणेश मंदिर बांधले जाणार आहे. राजगुरूनगर आणि चाकण बाजारात शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम आम्ही सर्व संचालक मंडळ एकविचाराने राबवित आहोत.बाजार समितीचा कारभार हा पारदर्शक आणि सर्वांना विश्वासात घेऊन सुरू आहे. अशोकदादा राक्षे - सभापती बाजार समिती